या देशात सुरु आहे चक्क कांद्याची तस्करी

 या देशात सुरु आहे चक्क कांद्याची तस्करी

मनिला, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीचे नुकसान झाल्यामुळे  जगातील अनेक देशांना अन्नधान्याच्या महागाईने ग्रासले आहे. फिलिपाईन्स या पॅसिफीक महासागरात 7 हजारहून अधिक बेटांवर वसलेल्या या आग्नेय आशियाई देशाला गेल्या वर्षभरात अनेक वादळांचा सामना करावा लागला. यामध्ये देशातील कोट्यांवधी रुपयांचे कांद्याचे पिक वाया गेले. त्यामुळे प्रचंड भाववाढीमुळे या देशात आता कांद्याची तस्करी सुरू झाली आहे.

कांदा हा फिलिपाईन्सच्या लोकांच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. या देशाचे नागरीक दर महिन्याला सुमारे 20 हजार मेट्रीक टन कांदा खातात. देशात सध्या  एक किलो कांद्याची किंमत तब्बल 900 रु झाली आहे. या किंमतीमध्ये तीन किलो चिकन खरेदी करता य़ेईल. या गगनाला भिडलेल्या भावामुळेच कांदा तस्करी सुरू झाली आहे. नुकतीच चीनहून पेस्ट्री बॉक्समध्ये लपवून आणलेला कांदा कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केला आहे. याआधी देखील कपड्यांच्या शिपमेंटमधुन लपवून आणण्यात आलेला तब्बल अडीच कोटींचा कांदा जप्त करण्यात आला होता.

SL/KA/SL

13 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *