अदानी इलेक्ट्रिकच्या प्रशासनाविरोधात, 13 जानेवारीला काळे फीत लावून आंदोलन
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आपल्या प्रलंबीत मागण्यांच्या मान्यतेसाठी अदानी अंगीकृत मुंबई उपनगर वीज कंपनीचे कामगार अदानी इलेक्ट्रिकच्या प्रशासनाविरोधात येत्या 13 जानेवारीपासून हातावर काळ्या फित बांधून आंदोलन करणार असल्याची माहिती मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात दिली. यावेळी त्यांच्यासोबत अध्यक्ष अशोक चव्हाण,नेते पवन गायकवाड आणि प्रकाश थोरात Prakash Thorat उपस्थित होते.
कामावर हजर राहताना व कामावरून घरी जाताना फेस पंचीग करण्याची अनिष्ठ पध्दतीचा अवलंब रद्द करावा, कंपनीचे काम करताना दिवसातून दोन ते चार वेळा कोणत्या ठिकाणी काम करता व कोणत्या मदतणीसाच्या समवेत काम करता हे दर्शविणारा भ्रमणध्वनीवर फोटो चित्रीत करून अपलोड करण्याची अनिष्ठ पध्दती बद्दल लेखी परिपत्रक व्यवस्थापनाने प्रसिद्ध करावे, कामगारांना धमक्या देण्याची अनिष्ठ पध्दत रद्द करावी,19 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या करारानुसार कंत्राटी कामगारांना व मृत कामगारांच्या मुलाना टप्याटप्याने कायम पदावर भरती करण्याची योजना अमलात आणावी,रिक्त झालेली 2900 पदे भरण्याचा निर्णय त्वरित घ्यावा, 19 सप्टेंबर 2016 च्या कराराप्रमाणे पॉवरलास भत्यात वाढकरून पॉवरलास भत्ता देण्याचा निर्णय घ्यावा.स्थायी व कंत्राटी कामगारांना साप्ताहिक सुट्टी दिवशी, सार्वजनिक सुट्टी दिवशी व जादा वेळ केलेल्या कामाचे दुप्पट वेतन द्यावे,कंत्राटी कामगारांना भविष्य निर्वाह निधी भरणा केलेली पावती सन 2010 पासुन देण्याची व्यवस्था करावी. आणि कोरोनाच्या प्रादुर्भावाने मृत पावलेल्या कामगारांच्या वारसांना 50 लाख रुपयाची आर्थिक मदत व वारसांना कंपनीच्या सेवे मध्ये सामावुन घेण्यात यावे अशी मागणी गायकवाड यांनी केली.
यावेळी श्री.गायकवाड म्हणाले कि, मुंबई उपनगर बीज कपनीचा ताबा 29 ऑगस्ट 2018 रोजी अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे.ताबा मिळविताना अदाणी व्यवस्थापनाने महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे मुंबई उपनगर बीज कंपनीमधील स्थायी, आणि कंत्राटी कामगार व अधिकारी याना कराराअन्वये मिळत असलेल्या सेवाशर्ती देण्यास अदाणी व्यवस्थापन फायदेशीर बांधील असल्याचे लेखी आश्वासन देवुन महाराष्ट्र राज्य विद्युत आयोगाकडून कंपनीचा ताबा मिळविण्याचा आदेश 29 ऑगस्ट 2018 पासून प्राप्त करून घेतला.Black ribbon protest on January 13, against the management of Adani Electric
यामुळे कामगारांना फायदा होईल अशी आशा असतानाच अदाणी व्यवस्थापनाने मुंबई उपनगर वीज कंपनीचा ताबा मिळविल्या पासून 19 सप्टेंबर 2016 रोजी स्थायी व कंत्राटी कामगाराच्या कराराप्रमाणे मिळणाऱ्या सोयी-सवलती अद्याप दिल्या नाहीत.त्याच बरोबर कोरोनाच्या काळामध्ये जिवावर उदार होऊन काम करताना कामगार मृत्यु पावले.त्यांच्या वारसांना केंद्र व राज्य सरकारने जाहिर केलीली 50 लाख रुपयाची विमा रक्कम दिली नाही.मृत पावलेल्या कामगारांच्या वारसांना नोकरीमध्ये घेतले नाही.तोटयामध्ये चालणाऱ्या ‘बेस्ट’ उपक्रमाने मृत पावलेल्या कामगारांच्या वारसाना 50 लाख रुपये दिले व कामगारांच्या वारसांना नोकरीमध्ये सामावुन घेतले आहे.त्याच बरोबर कोरोनाच्या महामारीमध्ये काम करणाऱ्या कामगाराना प्रत्येक कामाच्या दिवसाचे 300 रुपये दराने कोरोना भत्ता सुध्दा दिला आहे.अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या कामगारांना अदाणी व्यवस्थापनाने कोरोना भत्ता दिला नाही.या कारणाने खालील मुद्दयाच्या सोडवणूकिसाठी आंदोलन छेडण्याचा निर्णय उपनगर बीज कामगारांनी घेतला आहे.त्यास अनुसरून मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन या बृहन्मुंबईतील वीज कामगारांच्या मान्यताप्राप्त प्रातिनिधिक संघटनेने आंदोलनाची हाक दिली असून
13 जानेवारी पासून काळ्या फिती हाताला बांधून निषेध आंदोलन करणार आहोत असे गायकवाड यांनी सांगितले.
ML/KA/PGB
11 Jan. 2023