या कंपनीने तयार केली तुम्हाला मॅचिंग असे रंग बदलणारी गाडी

 या कंपनीने तयार केली तुम्हाला मॅचिंग असे रंग बदलणारी गाडी

मुंबई, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  प्रत्येक गोष्ट मॅचिंग असण्याचा ट्रेंड बराच काळ झाला मार्केटमध्ये आहे. पण कपड्याला मॅचिंग शूज, दागिने, पर्सबरोबर जर तुम्हाला गाडी मॅचिंग मिळाली तर…This company has created a color changing car called Matching You
हो आता हे ही शक्य आहे. बीएमडब्ल्यूने आता तुमची ही इच्छा देखील पूर्ण करायचे ठरवले आहे. कारण बीएमडब्ल्यूने रंग बदलणारी गाडी तयार केली आहे. जगातील प्रसिद्ध जर्मन ऑटोमोबाईल निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने लॉस वेगास येथे आयोजित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो २०२३ मध्ये ही रंग बदलणारी इलेक्ट्रीक कार प्रदर्शित केली आहे. या गाडीचे विशेष म्हणजे ही एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ३२ रंग बदलते.

आय व्हिजन डी ही बीएमडब्ल्यू ची रंग बदलणारी कार आहे. कंपनीने less is more या टॅगलाईनसह ही कार सादर केली असून रंग बदलण्यासाठी २४० ई-इंक पॅनल्सचा वापर करण्यात आला आहे. या पॅनल्समुळे या कारला ३२ रंग बदलता येतात. ही रंग बदल प्रक्रिया इलेक्ट्रीक सिग्नलद्वारे नियंत्रित करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, BMW – i-vision DEE पूर्ण चार्ज केल्यावर ५००-७०० किमी ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. चार्जिंगसाठी फास्ट चार्जर वापरला जातो. याशिवाय फुल टच स्क्रीन डॅशबोर्ड, हाय टेक फिचर्ससह प्रशस्त लक्झरी केबिन या कारमध्ये आहे. तसेच मोठ्या आकाराचे हेड अप डिस्प्ले, १६-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, एआय, व्हॉईस कमांड यांसारखे आधुनिक आणि प्रगत फिचर्स या कारमध्ये आहे.
या कारच्या किंमतीबाबत व लॉंचिगबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. २०२५ पर्यंत बीएमडब्ल्यू आपली ही टेक्नॉलॉजी बाजारात आणण्याची शक्यता आहे.

ML/KA/PGB
9 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *