कवाडेंशी जवळीक, आठवले रुसले

चंद्रपूर, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जोगेंद्र कवाडे Jogendra Kawade यांच्या पिरिपाचा महायुतीत समावेश केल्याविषयी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली असून यासंदर्भात आमच्याशी विचारविमर्श करायला हवा होता अशी भूमिका मांडली आहे.Kavade, Athavale

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत जोगेंद्र कवाडे यांच्या पिरीपा पक्षाच्या युतीची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात दाखल झालेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे सर्व होत असताना आमच्याशी विचारविमर्श करणे गरजेचे होते अशी भूमिका त्यांनी मांडली. याविषयी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपण चर्चा करणार असल्याचेही आठवले म्हणाले.महाराष्ट्रात महापुरुषांच्या अवमानाच्या संदर्भात सर्वांनीच भान बाळगणे गरजेचे असल्याचे मतही आठवले यांनी व्यक्त केले.

ML/KA/PGB
8 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *