‘ महाराष्ट्र केसरी ‘ ला मंगळवार पासून होणार सुरुवात…

 ‘ महाराष्ट्र केसरी ‘ ला मंगळवार पासून होणार सुरुवात…

पुणे, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा थरार राज्यातील कुस्तीपटूना मंगळवारपासून अनुभवता येणार आहे. १० ते १४ जानेवारी या कालावधीत या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा आखाडा भरणार असून आहे.

‘महाराष्ट्र केसरी’च्या विजेत्याला रोख पाच लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र केसरी’चे प्रमुख संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी दिली.’Maharashtra Kesari’ will start from Tuesday…

कोथरूड येथील कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी पैलवान, कुस्तीप्रेमींच्या मेळ्यासाठी सज्ज झाली आहे. भव्य ३२ एकर जागेत ही क्रीडानगरी साकारली असून, त्यात १२ एकरमध्ये ८० हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती व तीन गादीचे आखाडे आहेत.

राज्यातील ४५ तालीम संघातील विविध १८ वजनी गटात सुमारे ९०० पेक्षा अधिक पैलवान स्पर्धेत सहभागी होणार आहेत.तर चौदा जानेवारील संंध्याकाळी महाराष्ट्र केसरी किताबाकरता अंतिम लढत होणार आहे.

ML/KA/PGB
8 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *