आता गर्भातील बाळाच्या जनुकीय आजारांचे निदान शक्य
नागपूर, दि. 06 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जनुकीय वैद्यकशास्त्रात गेल्या काही दशकात खूप प्रगती झाली आहे, त्यामुळे गर्भावस्थेत चाचण्यांद्वारे जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये असणाऱ्या जनुकीय आजारांचे निदान ही शक्य आहे.
जगभरात सुमारे 6000 प्रकारचे जेनेटिक आजार आहेत आणि यावर या आजारांवर निदान करून उपचार शक्य आहे असे मत लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील जनुक वैद्यकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. शुभा फडके यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.Now it is possible to diagnose the genetic diseases of the baby in the womb
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये भाग घेण्यासाठी आल्या असता आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या चाचण्या व त्यावरील उपचार सध्या महाग असून शासनाच्या पुढाकाराने चाचण्या व उपचार सामन्याच्या आवाक्यात येणे शक्य असल्याचा विश्वास डॉ. शुभा फडके यांनी यावेळी व्यक्त केला.
जनुकीय आजारा संदर्भात जनजागृती होणे आवश्यक असून जनुकीय शास्त्रांची साक्षरता वाढणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळेला व्यक्त केले. जन्माला येणारे मुल निर्दोष असावे अशी प्रत्येक आई-वडिलांची अपेक्षा असते. याच इच्छेतून गर्भाची तपासणी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अश्या चाचण्यासाठी लोक पंधरा ते वीस हजार रुपये सहज खर्च करीत आहेत त्यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश आहे अशा सुविधा पुरविणारे उत्तम संततीची आश्वासने देणारे मुलांसाठीचा विमा देणारे असे अनेक घटक यामध्ये सक्रिय झाले आहेत. मात्र लोकांनी याला बळी पडू नये.
डॉक्टरांनी या संदर्भात त्यांना योग्य माहिती देणे गरजेचे आहे. गर्भाच्या कोणत्या आठवड्यापर्यंत अशी चाचणी केली गेली पाहिजे यावर बंधने घातले गेले पाहिजे. अशा प्रकारांसाठी नियमावली तयार करणे आवश्यक आहे काहीही केले तर अगदी परफेक्ट असे मूल खात्रीशीर रित्या जन्माला घालणे कुणाच्याच हाती नसल्याचे डॉ.शुभा फडके यांनी यावेळी सांगितले.
ML/KA/PGB
06 Jan. 2023