एका एकरमध्ये घेतले १८ क्विंटल कपाशीचे,३ क्विंटल तुरीचे उत्पादन…

 एका एकरमध्ये घेतले १८ क्विंटल कपाशीचे,३ क्विंटल तुरीचे उत्पादन…

जालना, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शेतकऱ्यांनी मनात आणले आणि त्यात जर त्याची प्रयोगशील वृत्ती असली तर तो कुठल्याही नैसर्गिक संकटावर मात करून शेतीत सोने उगवू शकतो, चांगले उत्पन्न घेऊ शकतो हे जालना जिल्ह्यातील कचरेवाडी येथील शेतकरी जगदीश जाधव यांनी दाखवून दिले आहे.18 quintals of cotton, 3 quintals of turi produced per acre…

त्यांनी पांढऱ्या सोन्यातून आर्थिक उत्पन्न मिळवले आहे. नुकतीच कपाशी पेरलेली, अतिवृष्टीचा प्रकोप चालू होता.तो संपतो ना संपतो तोच शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव सुरू झाला. पिकाचे नुकसान होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. त्यावेळी जालन्याचे कृषी विज्ञान केंद्र जगदीश जाधव यांच्या मदतीला धाऊन आले.

गेल्या वर्षी कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, जालना यांनी शेतकऱ्यांना घनपद्धतीने कपाशी लागवडीचे प्रशिक्षण दिले होते.त्या पासून प्रेरणा घेत जगदीश यांनी आपल्या १ एकर क्षेत्रावर घनपद्धतीने कपाशीची लागवड केली होती.त्यामुळे एक एकर क्षेत्रात जवळपास १४ हजार ५२० झाडे उगवली होती. परंतु शंखी गोगलगायीनी त्यातील ५२० झाडे खाऊन टाकली होती.

आता करायचे काय या विचारात असताना कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथील शास्त्रज्ञांनी त्यांना त्या जागी कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांनी विकसित केलेल्या तुरीच्या वाणाचा उपयोग करायचा सल्ला दिला. खाल्लेल्या ५२० कपाशीच्या रोपांच्या ठिकाणी तुरीची लागवड करण्यात आली आणि बघता बघता १४ हजार कपाशीच्या झाडांसोबत तुरीची ५२० झाडंही बहरून आली.

मर्यादित झाडांची वाढ,घनदाट पद्धतीने लागवड,रासायनिक खतांना फाटा देत कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली जगदीश जाधव यांची कपाशी आणि तूर इतकी बहरली की झाडं वाकून गेली.कपाशीच्या झाडावर ३५ ते ४० बोंड लगडली तर तुरीचे झाडं टपोऱ्या शेंगानी वाकू लागली आहेत. प्रत्येक बोंडाचे वजन ६/७ ग्राम इतकं आहे हे विशेष.

जगदीश यांना या एक एकर क्षेत्रातून आता पर्यंत १८ क्विंटल कापूस झालेला असून वेचणीला अत्यंत सोपा असल्याने आई, वडील,पत्नी व जगदीश या चौघांनी मिळूनच १ एकर क्षेत्रातील कापूस वेचून काढला.तुरीच्या शेंगांची तोडही सुरू केली असून त्यातून कमीत कमी ३ क्विंटल तुरीचे उत्पादन मिळणार आहे.18 quintals of cotton, 3 quintals of turi produced per acre…

सध्याच्या तुरीच्या भावानुसार ३ क्विंटल तुरीच्या उत्पन्नातून जगदीश यांचा कपाशी आणि तुरीच्या लागवडीचा,औषधांचा, खताचा,तोडणीचा खर्च निघून गेला असून १८ क्विंटल व अजूनही १ क्विंटल कापूस वेचायचा बाकी आहे हा निव्वळ नफा पदरी पडत आहे.

घनदाट पद्धती,पिकातील कमी अंतर,पिकांची मर्यादित वाढ,खताचे, पाण्याचे योग्य नियोजन आणि तज्ञांचे योग्य मार्गदर्शन यामुळे जगदीश यांना पांढऱ्या सोन्यातून भरघोस उत्पन्न मिळवता आले.इतरही शेतकऱ्यांनी यापासून प्रेरणा घेतली तर भरघोस उत्पन्नाचा राजमार्ग नक्की टप्प्यात आहे.

ML/KA/PGB
05 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *