मुलांच्या शिक्षणासाठी गावात दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद
सोलापूर, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंढरपूर तालुक्यातील Pandharpur taluka देगाव ग्रामपंचायतीने दोन तास मोबाईल आणि टिव्ही हा गावातील मुलांच्या अभ्यासासाठी व गाव साक्षर व सुशिक्षित होण्यासाठी बंद करावा. असा निर्णय घेतला. आणि या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे गावातील मुलांना शैक्षणिक रुचीसंपन्न वातावरण निर्माण झाले आहे.TV and mobile phones are off for two hours in the village for children’s education
विशेष म्हणजे यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव करून थेट गावकारभारी अग्रेसर झाले आहेत.
टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे शालेय विद्यार्थ्यांच्याअभ्यासावर शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. यावर उपाय म्हणून सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत गावातील सर्व टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय पंढरपूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीने घेतला.
या निर्णयाची माहिती ग्रामपंचायतीच्या शिपायाने गावातून दवंडी पेटवून दिली आहे. संध्याकाळी सहा वाजले की ग्रामपंचायत कार्यालयावरून भोंगा वाजतो आणि गावातील सर्व टीव्ही आणि मोबाईल हे बंद होतात , पालकच आपल्या मुलांना घेऊन अभ्यासाला बसतात.
असाच भोंगा पुन्हा रात्री आठ वाजता वाचतो आणि मुलांच्या अभ्यासाची वेळ तसेच ग्रामपंचायत यांच्या निर्णयाची निर्धारित वेळ संपते. सहा ते आठ असा दोन तास अभ्यासाची वेळ आणि या दोन्ही वेळेस भोंगा वाजून संपूर्ण गावाला टीव्ही आणि मोबाईल बंद करण्यासाठी प्रवृत्त केले जाते.
दहावी, बारावीच्या परीक्षा आगदी तोंडावर आल्या आहेत. मुलांचे लक्ष अभ्यासात लागावे. यासाठी गावातील प्रत्येक घरातील टीव्ही,मोबाईल दररोज दोन तास बंद ठेवण्याचा निर्णय़ येथील ग्रामस्थांनी घेतला आहे. या निर्णयाची माहिती ग्रामपंचायतीच्या शिपाया मार्फत गावातून दररोज दवंडी देवून केली जात आहे. त्यामुळे साक्षर आणि सुशिक्षित गावासाठी आता गाव कारभार यांनी अनोखा निर्णय घेऊन पुढाकार घेतल्याचे पहावयास मिळते आहे.
विशेष म्हणजे टीव्ही आणि मोबाईल बंद असा निर्णय घेत असताना. गावातील कोणी दिलेल्या वेळेत टीव्ही अथवा मोबाईलचा वापर करताना आढळून आल्यास त्या कुटुंबाला एक हजार रुपये दंड करण्याचाही निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. शाळेतील मुलांच्या अभ्यासासाठी असा निर्णय
घेणारी देगाव ग्रामपंचायत सोलापूर जिल्ह्यात एकमेव ठरली आहे.
ML/KA/PGB
05 Jan. 2023