भयंकर – दोन महिन्यांच्या बाळाला माकडाने फेकले छपरावरून

 भयंकर – दोन महिन्यांच्या बाळाला माकडाने फेकले छपरावरून

लखनौ, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क)  : माकडांच्या टोळ्यांचा मानवी क्षेत्रात घुसुन उच्छाद माजवण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आजवर पिकांची नासाडी करणारी ही मर्कटे आता मानवी जीवाला धोका निर्माण करत आहेत. उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यामधील तिंदवारी पोलीस स्थानकामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील छापर गावामध्ये माकडांची दहशत मागील बऱ्याच काळापासून आहे. मागील दोन महिन्यांपासून माकडांनी या गावामध्ये उच्छाद मांडला आहे. अशाच एका घटनेमध्ये माकडाने घराच्या अंगणात झोपलेल्या एका दोन महिन्याच्या बाळाला उचलून पळ काढला.

माकड या बाळाला घेऊन जात असल्याचं दिसताच घरातील सदस्यांनी आरडाओरड केला. यानंतर माकडाने घराच्या छप्परावरुन बाळाला खाली फेकलं. या घटनेमध्ये बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर वनविभागाविरोधात गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी वनविभागाच्या लोकांनी या प्रश्नाकडे कानाडोळा केल्याने या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

SL/KA/SL

4 Jan 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *