मराठी भाषेचा सहजसाध्य वापर आणि वावर सर्वत्र व्हावा
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज मुंबईत गौरवपूर्ण रीतीने विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. मराठी भाषेत खूप मोठ्या प्रमाणात बदल होत गेले आहेत. आधीच्या काळात सतरावे शतक, ब्रिटिशांच्या राज्यात अनेक बदल झाले. साहित्याचे लोकशाहीकरण झाले. मराठी भाषा ही संस्कृतीशी जशी संबंधित आहे तशी ती रोजगार, पर्यटन, उद्योगांनाही संबंध आहे. धार्मिक कॉरिडॉर तयार करताना मराठी भाषेचा अधिक उपयुक्त वापर होऊ शकतो. उद्योजकांनी देखील आपले व्यवसाय करताना मराठीचा वापर करणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने मुंबईत आयोजित संमेलनात
“मराठी भाषा काल, आज आणि उद्या” या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्ष पदावरून त्या बोलत होत्या. या परिसंवादात लेखिका संजीवनी खेर, प्रकाशक हर्ष भटकळ आणि श्रीकांत बोजेवार यांनी सहभाग घेतला. सूत्र संचालन अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी केले.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘ आपल्या मराठी बोली भाषेचे एक सौंदर्य आहे, त्यातल्या त्यात स्त्रीची बोली भाषा अधिक शक्तिशाली आहे. मराठी भाषा बोलताना अनेकदा हातवारे वेगळे होतात. ती केवळ पुतळ्यासारखी नाहीये. मराठी भाषा ही महाराष्ट्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनिवार्य असावी असा कायदा झाला आहे. त्याची अंमलबजावणी व्हावी. यासाठी उद्योग विभागाने काम करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा, इतिहास, शास्त्र, गणित, शेतीमध्ये ज्ञान देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागासोबत समन्वय व्हावा. विश्वात्मके देवे या दृष्टिकोनातून वसुधैव कुटुंबकम कल्पना प्रत्यक्षात यावी. पुस्तकांची खरेदी, वाचन मोठ्या प्रमाणात व्हावी. कठीण शब्द वापरण्यापेक्षा सोप्या शब्दांचा वापर व्हावा. आपला आत्मविश्वास कायम ठेवून आपण हे काम सुरू ठेवले याबद्दल आपले अभिनंदन. असेच संमेलन पुण्यातही घ्यावे अशी यावेळी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
ML/KA/PGB
4 Jan 2022