दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोरील रस्त्याचे “ऍड. डी. बी. पाटील मार्ग” नामकरण
भाईंदर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :नवीन वर्षाचे औचित्य साधून मिरा- भाईंदर येथील नवीन दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोरील रस्त्याचे “ऍड. डी. बी. पाटील मार्ग” असे नामकरण करण्यात आले.Road in front of Civil and Criminal Court “Ad. D. B. Patil Marg” naming
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेने एक मताने न्यायालयासमोरील रस्त्यास ऍड. डी. बी. पाटील मार्ग असे नाव देण्याचा ठराव पारित केला होता. विशेष म्हणजे सर्व पक्षीय सदस्यांनी त्या संदर्भात लेखी शिफारस केली होती.
न्यायलयासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला “ऍड. डी. बी. पाटील मार्ग” नाम फलक लावत त्याचे उद्घाटन ज्येष्ठ फौजदारी वकील नानासाहेब मोटे व वत्सला दादासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाईंदरचे ज्येष्ठ समाजसेवक व माजी सभागृह नेते रोहिदास पाटील, मिरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता, भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास, महापालिकेचे सचिव वासुदेव शिरवळकर, तसेच माजी नगरसेवक ओमप्रकाश गारोडिया,. ध्रुवकिशोर पाटील, . प्रकाश दुबोले, भगवती शर्मा, ऍड. एस. ए. खान, आणि मिरा – भाईंदर ऍडव्होकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. डी. जी. नाईक, सचिव . प्रवीण पाटील, सर्व पदाधिकारी तसेच भाईंदर व ठाणे येथील अनेक ज्येष्ठ वकील उपस्थित होते.
सदर कार्यक्रमामध्ये भाईंदर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व १९७६ पासून वकिली व्यवसाय करणारे व ज्यांनी भाईंदर येथे न्यायालयाची स्थापना करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अथक प्रयत्न केले अशा ऍड. डी. बी. पाटील यांचे नाव योग्य ठिकाणी दिल्याने सर्वांनी आपल्या भाषणात आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी पाटील यांचे पुत्र ऍड संदेश पाटील व एड आदेश पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व महापालिकेचे व सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. दिलीप पंडित यांनी केले.
ML/KA/PGB
3 Jan 2022