भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

 भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पुणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जगताप यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते.जगताप यांची गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. जगताप हे तीन टर्म आमदार राहिले आहेत.

ते 2014 व 2019 मध्ये चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवड़ून आले होते. लक्ष्मण जगताप 2014 मध्ये भाजपमध्ये येईपर्यंत ते राष्ट्रवादीचे नेते मानले जात होते. 2014 व्यतिरिक्त, त्यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. जगताप यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कधीही निवडणूक हरली नाही. ते प्रथम 1986 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले आणि नंतर 2006 पर्यंत वारंवार विजयी झाले होते.

आमदार लक्ष्मण जगताप  यांच्यावर पिंपळे गुरव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ML/KA/SL

3 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *