चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचे निधन
मुंबई, दि. 1 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रभात चित्रपट मंडळाचे संस्थापक आणि लोकप्रिय मराठी चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर (८२) यांचं आज सायंकाळी ५ वाजता निधन झालं आहे. गेले काही दिवस ते आजारी होते. चित्रपट सर्वसामान्य माणसांमध्ये रुजवण्यात सुधीर नांदगावकर यांचं फार योगदान आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला. दर्जेदार आणि परखड लिखाण आणि चित्रपटक्षेत्रातील दांडगा अभ्यास यामुळे त्यांच्या नावाला मनोरंजनसृष्टीत एक वजन होतं.
चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणारे सुधीर नांदगावकर यांनी एम.ए. ची पदवी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली. आचार्य अत्रे यांच्या दै. मराठा मध्ये चित्रपट समीक्षक म्हणून ते उपसंपादक होते. पोतदार महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. सुधीर नांदगावकर यांनी मुंबईत प्रभात मित्रमंडळ ह्या फिल्म सोसायटीची स्थापना केली.
SL/KA/SL
1 Jan. 2023