क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात
या भीषण अपघातीच माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले .डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
अपघातस्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, ऋषभची कार रेलिंगला धडकली, त्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या प्रयत्नानंतर कारची आग विझवण्यात यश आलं.
30 Dec. 2022