शेअर बाजारात मोठी घसरण
मुंबई, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज भारतीय शेअर बाजारात गेल्या तीन महिन्यांतील सर्वांत मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 60,000 च्या खाली आणि निफ्टी 18000 च्या खाली घसरला आहे. मिडकॅप निर्देशांकात 1200 अंकांची घसरण झाली आहे. आजच्या दिवस अखेर BSE सेन्सेक्स 980 अंकांनी घसरून 59,845 वर आणि निफ्टी 320 अंकांनी घसरून 17,806 अंकांवर बंद झाला.
आज बाजारात एकूण 3643 शेअर्सची खरेदी-विक्री झाली, त्यापैकी 3168 शेअर्सचे भाव घसरले तर केवळ 400 शेअर्समध्ये वाढ झाली. 75 शेअर्सच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. शेअर बाजारातील घसरणीत गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 8.50 लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.
SL/KA/SL
23 Dec. 2022