महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक ;पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन

 महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक ;पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन

नागपूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिंदे – फडणवीस सरकारने जयंत पाटील यांच्यावर केलेली कारवाई आणि कर्नाटक सरकारविरोधात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून त्यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले, त्यांनी सभागृहात न जाता पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र सकाळी झालेल्या विशेष सत्रातील लक्षवेधी सूचना चर्चेत ते सहभागी झाले होते.

ML/KA/SL

23 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *