सीमावाद आता पंतप्रधान आणि शहांच्या दरबारात

 सीमावाद आता पंतप्रधान आणि शहांच्या दरबारात

दिल्ली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi तसेच अमित शहा Amit Shah यांच्या दरबारात पोहोचला असून दोन्ही बाजूच्या खासदारांनी आज या दोन्ही नेत्यांची भेट घेतली.Borderism now in the court of Prime Minister and Shah

खा उदयन राजे, खा अनिल बोंडे आदींनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून एक निवेदन दिले त्यात सीमावाद आणि राज्यपाल कोषियारी यांच्या वक्तव्यावर चर्चा करण्यात आली, आपले मुद्दे आपण मोदी यांच्या कानावर घातले असे उदयन राजे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

त्यानंतर गृहमंत्री अमित शहा Amit Shah यांना महाविकास आघाडीच्या खासदारांनी भेटून सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी एक निवेदन दिले. कन्नड रक्षण वेदिके कडून होत असलेल्या हिंसेबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनाही समज देण्याची मागणी त्यांनी केली.

ML/KA/PGB
9 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *