हिंसाचार त्वरित थांबवा
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कर्नाटकात आज घडलेल्या हिंसाचार आणि महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष करण्याच्या प्रकारांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकार थांबण्याचे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या कडे केली आहे.Karnataka Chief Minister Basavaraj Bommai
फडणवीस यांनी याप्रकरणी तातडीने दूरध्वनी केला आणि बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी नोंदविली.असे प्रकार तातडीने थांबवा अशी मागणी त्यांनी केली.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. महाराष्ट्रातून येणार्या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.
ML/KA/PGB
6 Dec .2022