केंद्र पुरस्कृत योजनेत मत्स्य व्यावसायिकांची मोठी भरारी, एक एकर जागेवर साकारली मत्स्यशेती
चंद्रपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूरच्या मत्स्यव्यवसाय विभागाने पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेबाबत मोठी कामगिरी केली आहे. या केंद्र पुरस्कृत योजनेत चंद्रपूरकर मत्स्य व्यावसायिकांनी मोठी भरारी घेतली आहे.In a centrally sponsored scheme, a large influx of fish professionals
चिमूर तालुक्यात अभिनव नाईक या शेतकऱ्याने एक एकर जागेवर मत्स्यशेती साकारली आहे. पहिल्या वर्षी 4 लाख रुपयांचे मासे उत्पादन हाती आले असून यंदा हा आकडा 10 लाखांवर जाणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट्य डोळ्यापुढे केंद्र शासनाची ही योजना राबविली जात आहे.
लाभार्थी नाईक यांचेकडे वडिलोपार्जित 10 एकर शेतजमीन आहे. शेतीसोबत जोडधंदा म्हणून परिवारासाठी हा व्यवसाय खूप उपयुक्त असल्याचे त्यांचे मत आहे. शेतीतून उत्पन्न कमी मिळत असल्यामुळे जोडधंदा म्हणून मत्स्यव्यवसाय केल्याने त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होत आहे.
मत्स्योत्पादन क्षेत्राला चालना देणे आणि मच्छीमारांचे उत्पन्न दुप्पट करणे यासह भारतातील मत्स्यव्यवसायात शाश्वत आणि जबाबदार विकासाच्या माध्यमातून नीलक्रांती घडवून आणणे या उद्देशाने 2020 पासून 5 वर्षे ही योजना राबविली जाणार आहे.
या योजनेसाठी केंद्र सरकारने 20 हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. मत्स्योत्पादन क्षेत्राला प्रथमतःच एवढ्या मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचा फायदा ग्रामीण भागातील मत्स्यशेतीला होताना दिसत आहे.
ML/KA/PGB
30 Nov .2022