किटकनाशक ऑनलाईन विक्रीला कृषी मंत्रालयाची परवानगी
नवी दिल्ली,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क : ‘डिजिटल इंडिया’ धोरण सर्वसमावेशक करण्यासाठी केंद्र सरकार (Digital India Policy) विविध उपाययोजना आमलात आणत आहे. देशातील मोठ्या संख्येने असलेल्या शेतकरी वर्गाला ऑनलाईन खरेदी प्लॅटफार्म वर आणण्यासाठी आता केंद्रीय कृषी मंत्रालयाने कीटकनाशकांची (Online Pesticide Sale) ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन विक्री करण्यात अधिकृत परवानगी दिली आहे. यामुळे व्यवसायात स्पर्धा निर्माण होऊन किफायतशीर किंमतीत कीटकनाशके मिळाल्यास शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होऊ शकतो. ministry-of-agriculture-gives-permission-to-sell-pesticides-online
काही नियम-अटींच्या पालना करून शेतकऱ्यांना आता अगदी दारापर्यंत कीटकनाशके उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना कीटकनाशक खरेदीसाठी तालुक्याच्या गावी पडणारा हेलपाटा ही वाचणार आहे.
देशभरात ८६ हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेला कीटकनाशके आता ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याने डिजिटल विक्रीला चालना मिळणार आहे.
कीटकनाशक ऑनलाईन विक्रीसाठी नियम/अटी
1) ऑनलाइन विक्री करताना ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) कायद्या(२०२०)चे पालन करावे लागेल.
3) ऑनलाइन विक्रीसाठीच्या परवान्याचे नियमानुसार मुदतीत नूतनीकरण आवश्यक
‘ऑनलाइन निविष्ठा खरेदी हा शेतकऱ्यांचा हक्क’ असून शेतकऱ्यांनाही आपल्या गरजेच्या वस्तू खरेदी करताना स्पर्धात्मक लाभ मिळावा, असे मत शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी व्यक्त केले होते. केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे स्थानिक निविष्ठा विक्रेत्यांनाही नवी संधी उपलब्ध होणार आहे. त्यांनीही बाजारपेठेच्या बदलत्या स्वरूपात आपल्या व्यवसाय वृद्धीची संधी शोधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर साठेबाजी करणाऱ्यांवर नियंत्रण येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मागणीनुसार कीटकनाशकाचा पुरवठा होईल. असे मत कृषी निविष्ठा बाजार अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
SL/KA/SL
30 Nov. 2022
Ministry of Agriculture gives permission to sell pesticides online