वाढवण बंदराच्या विरोधात आझाद मैदानात 

 वाढवण बंदराच्या विरोधात आझाद मैदानात 

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :२१ नोव्हेंबर या जागतिक मच्छीमार दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’च्या घोषणा देत पालघर जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी आज आझाद मैदानात आक्रोश मोर्चा काढत वाढवण बंदराच्या उभारणीचा जोरदार विरोध दर्शविला.

१९९८ मध्ये स्थानिकांच्या एकजुटीने रद्द करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराने पुन्हा डोके वर काढले आहे. पुन्हा हे बंदर उभारण्याचा प्रयत्न करून स्थानिकांचे स्वातंत्र्य पायदळी तुडविण्याचे प्रयत्न होत आहे .

या बंदरामुळे समुद्रात सुमारे साडेपाच हजार एकरावर भराव केला जाणार आहे. हा भराव करण्यासाठी डहाणू पट्ट्यातील डोंगर टेकड्या तोडल्या जाणार. या प्रकल्पामुळे 47 गावे आणि 261 पाडे प्रकल्प बाधित होणार आहेत.त्यामुळे पालघर जिल्ह्यासह, कोकण, मुंबईमधील मच्छीमार, शेतकरी, डायमेकर, नोकरदार, बागायतदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे या बंदराच्या विरोधात तरुण, महिला, आबालवृद्ध इत्यादींनी एकत्र येऊन राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आझाद मैदान दणाणून सोडले.

या आंदोलनात वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, नॅशनल फिश वर्कस फोरम, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ, ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, भूमी सेना, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना आदी विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

ML/KA/PGB

21 Nov 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *