कतार येथील फिफा वर्ल्ड कपच्या तयारीसाठी घामाबरोबरच वाहिले आहे हजारोंचे रक्त…

 कतार येथील फिफा वर्ल्ड कपच्या तयारीसाठी घामाबरोबरच वाहिले आहे हजारोंचे रक्त…

कतार, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बहुचर्चित फिफा वर्ल्ड कपला कालपासून सुरुवात झाली आहे. फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद कतारकडे आहे. २९ दिवसांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी गेल्या १२ वर्षांपासून कतारमध्ये तयारी सुरू आहे. परंतु दरम्यान, एका रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेपाळसह भारतातील हजारो जणांना या तयारीत आपला प्राण गमवावा लागला आहे.

७ नवीन स्टेडियम, १०० हून अधिक हॉटेल्स, नवीन स्मार्ट सिटी, नवीन विमानतळ आणि नवीन मेट्रो लाईन या वर्ल्ड कपचे औचित्य साधून बांधण्यात आली आहेत. यादरम्यान सुमारे १७.९ लाख कोटी खर्च करण्यात आला. मात्र, हजारो कामगारांना आपला प्राण गमवावा लागला.The blood of thousands has been shed along with the sweat for the preparation of the FIFA World Cup in Qatar…

फिफा विश्वचषकाच्या तयारीसाठी कतार मध्ये ७० हजारांहून अधिक मजूर काम करत होते. या मजुरांना ४१ ते ४२ अंश तापमानात काम करावे लागत. 15 तास काम केले, तरीही योग्य पगार मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे.
ऍम्नेस्टी इंटरनॅशनल रिपोर्ट २०२१ प्रकाशित होणार आहे. १० वर्षांनंतर १५,०२१ स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे.

२०२१ मध्ये द गार्डियनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात कतारमध्ये २०१० पासून ६,५०० पेक्षा अधिक मजूरांचा मृत्यू झाला आहे. भारत, नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशातील स्थलांतरित मजुरांचा यात समावेश आहे.
मात्र, विश्वचषकाची तयारी करत असताना बांधकामाच्या ठिकाणी कामगारांचा मृत्यू झाल्याचा दावा दोन्ही संघटनांनी केलेला नाही.

कतार सरकारच्या म्हणण्यानुसार, २०१४ ते २०२० दरम्यान ३७ लोक कार्यरत साइटवर मरण पावले, ज्यामध्ये केवळ 3 मृत्यू कामाशी संबंधित होते. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मते, २०२१ मध्ये ५० स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला, १५०६ गंभीर जखमी झाले आणि ३७,६०१ किरकोळ जखमी झाले आहेत.

ML/KA/PGB
21 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *