वाघोबाने चक्क रोखून धरला हमरस्ता
वर्धा, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्याच्या सेलू – गरमसुर-मासोद रस्ता काल रात्री चक्क वाघाने रोखला, वाघाने दिलेल्या डरकाळी चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे.tiger almost stopped Hamrasta
वर्धा बोर अभयारण्य भागातील सेलू – गरमसुर – मासोद परिसरात रात्री चक्क वाघाने रस्ता रोखून धरला. काहीकाळ वाघ हा रस्त्यावर बसून होता. तेथून चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना वाघ दिसताच त्यांनी वाघाचे चित्र मोबाईल कॅमेऱ्यात टिपलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जंगलाचा राजा म्हटलं तर सर्वांच्या डोळ्यासमोर वाघ उभा राहतो. असाच रस्त्याने जाताना जर अगदी डोळ्यासमोर वाघ दिसला तर त्यावेळी सर्वांची धडकी भरते. हाच वाघ बघण्यासाठी पर्यटक जंगलात बघायला गेल्यावर तो वेगळाच आनंद अनुभवतो. सध्या या परिसरात वाघाची दहशत कायम आहे. यातच शेत शिवारात दिवसाढवळ्या शेतकरी व शेतमजूर यांना वाघाचे दर्शन घडतात.tiger almost stopped Hamrasta
अश्यातच वर्धा शहराकडे जाणाऱ्या येणाऱ्याना अनेकदा वाघासह हिंसक प्राण्याचे दर्शन घडते. अनेकदा वाघ,अस्वल,
बिबट, यासह इतर प्राण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
वर्धा जिल्ह्यातील काही भाग जंगलाने व्याप्त झालेला आहे. या जिल्ह्यात बोर अभयारण्य प्रकल्प आहे. या जंगलातून अनेक प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आहे. रात्रीला अनेकदा या रस्त्याने ये जा सुरू असते त्यात काहींना वाघाचे दर्शन होते .
ML/KA/PGB
21 Nov .2022