कर्नाक पूल पाडण्याचे काम यशस्वीरित्या वेळेआधीच पूर्ण
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मध्य रेल्वेने २७ तासांच्या ब्लॉक दरम्यान mega block कर्नाक पूल तोडण्याचे काम यशस्वीरित्या करून काटेकोर नियोजनाचे उत्तम उदाहरण दिले आहे.
२७ तासांचा हा ब्लॉक काल दि. १९ रोजी रात्री ११ ते दि २१ रोजी दुपारी ०२ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा/वडाळा स्थानकांदरम्यान सर्व सहा लाईन, ७वी लाईन आणि यार्डवर करण्यात आला होता.
अप आणि डाउन धिम्या मार्गावर आणि अप आणि डाउन जलद मार्गावरील रेल्वे वाहतूक शेड्यूलपूर्वी पूर्ववत केली. पहिली लोकल ट्रेन दुपारी ३.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ठाणेकरीता सुटली जी कर्नाक ब्रिज डिस्मेंटलिंग साइट येथून सायं ४ वाजता गेली. हार्बर मार्गही वेळापत्रकाच्या आधी म्हणजे सायं. ५ .४६ वाजता पूर्ववत करण्यात आला. हार्बर मार्गावरील पहिली ट्रेन पनवेल- वडाळा लोकल वडाळा येथून ५.४६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकरीता रवाना झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५.५२ वाजता सुटली.
७ वी लाईन आणि यार्डचे काम प्रगतीपथावर आहे आणि शेड्यूल प्लॅनपूर्वी पूर्ण होणे अपेक्षित आहे.
भूतकाळातील घडामोडींचा मागोवा घेऊन, हे मोठे कार्य पार पाडण्यासाठी एक अभिनव नियोजन करण्यात आले. ब्लॉक असणाऱ्या दिवसापूर्वी १००% ट्रफ आणि स्लॅब काँक्रीट काढणे आणि उपलब्ध कॉरिडॉर मार्जिनमध्ये पाथवे काढणे तसेच स्टँडबाय क्रेनमुळे वेळेआधीच काम पूर्ण करण्यास मदत झाली आहे.
ML/KA/PGB
20 Nov 2022