उत्तर भारतातील ‘राजमा’ पिकाची लागवड आता महाराष्ट्रात

 उत्तर भारतातील ‘राजमा’ पिकाची लागवड आता महाराष्ट्रात

वाशिम, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काळानुरुप शेती व्यवसायामध्ये बदल होत आहे. पिकाची लागवड ही त्याच्या उत्पादनावर ठरत आहे. खरिपात सोयाबीन तर रब्बी हंगामात गहू, हरभरा ही ठरलेली पिके आहेत. मात्र, यामध्ये देखील आता बदल होत आहे. वाशीम जिल्ह्यातील फाळेगांव थेट येथील गावात १९ शेतकऱ्यांनी आपल्या ३५ एकर क्षेत्रावर रब्बी हंगामात ‘ राजमा ‘ पिकाची लागवड केली आहे.Cultivation of ‘Rajma’ crop in North India now in Maharashtra

वाशीम जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी राजमा लागवड केलेल्या क्षेत्राची व शेतकरी गट व कृषी विभाग यांनी श्रमदानातून संतोष मोतीराम कोरडे यांच्या शेतात बांधलेल्या वनराई बंधाऱ्याची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी उमेश राठोड, तंत्र अधिकारी प्रकाश कोल्हे, मंडळ कृषी अधिकारी भागवत किंगर प्रामुख्याने उपस्थित होते.

उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात राजमा हे पिक घेण्यात येते. सोयाबीनप्रमाणेच कमी दिवसांमध्ये अधिकचे उत्पन्न देणारे शेंगावर्गीय पिक म्हणून या राजमाकडे पाहिले जाते.याला श्रावणी घेवडा असेही म्हणतात.

शेतीत नेहमीच नवनवीन प्रयोग करणारे फाळेगांव थेट येथील शेतकरी रब्बीमध्ये पारंपरिक गहू, हरभरा पिकाकडे न वळता या हंगामात त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार राजमा पिकाची लागवड केली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास आगामी काळात वाशीम जिल्ह्यातही राजमा पिकाचे क्षेत्र वाढणार आहे.

ML/KA/PGB
17 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *