अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आझाद मैदानात निदर्शने

 अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आझाद मैदानात निदर्शने

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, पोषण ट्रॅकर व ग्रॅच्युईटीबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन व अन्य महत्वाच्या मागण्यांसाठी आज अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानात जोरदार निदर्शने केली. एका बाजूला महागाई प्रचंड वाढलेली आहे. तर, दुसऱ्या बाजूला अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरील कामाचे ओझे व ताण, तणाव यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नुकतीच जालना जिल्ह्यातील एका अंगणवाडी सेविकेनी अंगणवाडीतच आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे.Anganwadi workers protest in Azad Maidan

कामाच्या ताणामुळेच ही आत्महत्या झाली असल्याचा संशय आहे. गेली ५ वर्षे राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कोणतीही वाढ केलेली नाही. केंद्र शासनाने देखील गेली ४ वर्षे मानधनात वाढ केलेली नाही. कृती समितीच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासन मानधनात वाढ करेल अशी अपेक्षा होती व शासनाने देखील त्याबाबतीत कृती समितीसोबत बैठक घेतली. तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर चर्चा केली व दिवाळीपूर्वी मानधन वाढवण्याचे आश्वासन दिले.मात्र ते पाळले नाही.त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा मोर्चा काढावा लागत असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले. या मोर्चात राज्यभरातील हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.

ML/KA/PGB
15 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *