विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या “मृदगंध पुरस्कारांची घोषणा

 विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या “मृदगंध पुरस्कारांची घोषणा

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १२व्या स्मृतिदिनानिमित्त लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फौंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कारांची घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप व सरिता उमप यांनी केली .हा पुरस्कार सोहळा २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी,येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम विना मूल्य असेल . या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्य व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार , मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, आमदार आशिष शेलार, जेष्ट दिग्दर्शक राज दत्ता, अशोक पत्की व आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.Announcement of Vitthal Ump Foundation’s “Mridgandh Awards

लेखक आणि साहित्यिक फ. मु. शिंदे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे ,अभिनय क्षेत्रात संजय मोने व सुकन्या मोने,संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या रवींद्र साठे,लोककलेसाठी कमल शिंदे,आणि नवोन्मेष प्रतिभा पुरस्कारासाठी’ चला हवा येऊ द्या’फेम श्रेया बुगडे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.शाल, मानपत्र, विठल उमप याची प्रतिकृती असलेले स्मृति चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असणार आहे.विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोहामध्ये सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण उस्ताद राशीद खान, हे या कार्यक्रमाचं आकर्षण आहे. याच बरोबर कोकण कन्या यांचा फुशन ब्यांड होणार आहे. त्याचबरोबर लोकसंगीत नंदेश उमप सादर करतील. या कार्यक्रमाच सूत्र संचालन श्रीमती डॉ.समीरा गुजर – जोशी करणार आहेत, अशी माहिती नंदेश उमप यांनी दिली.

ML/KA/PGB
15 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *