सहज बोलायला नागरीक नाही… तुम्ही राज्याचे मंत्री आहात

 सहज बोलायला नागरीक नाही… तुम्ही राज्याचे मंत्री आहात

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  तुमच्यामध्ये वाचाळवीरांचे मोठं प्रस्थ वाढले आहे. काही मंत्री बोलत आहेत त्यातून मंत्रीमंडळाची प्रतिमा खराब होत आहे. लोक ऐकून घेत असतात…पहात असतात …लक्षात ठेवत असतात …काहीजण सहज बोललो म्हणत आहेत… तुम्ही सहज बोलायला नागरीक नाही… तुम्ही राज्याचे प्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही शपथ घेतलेली आहे… तुमच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारमधील वाचाळवीरांना आज खडसावले. ते माध्यमांशी बोलत होते.Not a civilian to speak easily… You are a minister of state

मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहिण सुप्रिया हिला काही बोलले… विनाशकाले विपरीत बुद्धी… हेच त्यांना बोलले पाहिजे… काय आपण बोलतोय… मंत्री केलं म्हणजे वेगळे झाले का… मंत्री पदे येतात… जातात… कोण आजी… कोण माजी असतात. परंतु शेवटी आपण नागरीक आहोत संविधान… कायदा… नियम याचा सर्वांनी आदर करायचा असतो पण यामध्ये हे चुकत आहेत असे स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

अंबरनाथमध्ये दोन गटात गोळीबार करण्याची घटना बैलगाडी शर्यतीत घडली… बैलगाडी शर्यतीमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडतेय… सरकार काय करतंय?… ठाण्यात किसननगर भागात शिंदे – ठाकरे गटात राडा झाला अशी राडेबाजी करुन चालणार नाही…पोलिसांना बाकीच्यापेक्षा याच गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. हे काय चालेल आहे असा सवालही अजित पवार यांनी सरकारला केला.

किती लोकांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवली आहे असे सांगतानाच त्यांना खरंच ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा आवश्यक आहे का? … काहींचा तर ३० – ३० सरकारी गाड्यांचा ताफा फिरत आहे. मी उपमुख्यमंत्री होतो जास्त गाड्या असल्या की नको सांगत होतो. हा पैसा तुमचा नाहीय… सरकारकडे टॅक्स रुपाने आलेला आहे. ज्या आमदाराला कुठल्याही पक्षाच्या बंदोबस्त द्यायचा असेल तर जरुर द्या आणि तो दिलाही पाहिजे त्यांचे व नागरीकांचे संरक्षण करणे, महाराष्ट्रातील शेवटच्या जनतेचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरसकट सगळ्यांना? … काही माजी नगरसेवकांना सरकारी संरक्षण… कोण त्याला काय करतंय… तो माजी झाला ना… त्याने गंभीर चुका केल्या असतील तर तो निस्तारेल… त्यासाठी सरकारी यंत्रणांचे संरक्षण देण्याची काय आवश्यकता असा संतप्त सवालही अजित पवार यांनी केला.Not a civilian to speak easily… You are a minister of state

माझा पाच दिवसाचा परदेशातील कार्यक्रम फार पूर्वी ठरला होता तो रद्द करता आला नाही. शिर्डीतील शिबीराला एक दिवस उपस्थित राहून गेलो मात्र एवढया दिवसात मी प्रेस समोर आलो नाही तर अजित पवार कुठे गेले आहेत. अजित पवार उपलब्ध नाहीत. अजित पवार नाराज… फारच प्रेम आमच्यावर ऊतू जातं.. अशा काही बातम्या येत होत्या. जे काही आहे ते मी स्पष्टपणे सांगत असतो. राजकारणात असल्यामुळे लोकांमध्ये काम करत असताना अशा गोष्टी लपवून ठेवणे चालत नसते. मात्र चार – पाच दिवसात ज्या काही घटना घडल्या त्यावेळी मी इथे नव्हतोच. त्यामुळे स्टेटमेंट आले नाही असा खुलासा रोज येणाऱ्या बातम्यावर अजित पवार यांनी केला.

पोलीस आणि सचिवांनी आपली भूमिका कणखर मांडली पाहिजे. भारतात आपल्या राज्याचा नावलौकिक आहे तो ढासळू देता कामा नये.पण काही आयपीएस आणि आयएएस अधिकारी जे जवळचे असतात त्यांनी जाऊन हे लवकर दुरुस्त केले तर सर्वांनाच अडचणीचं होणार आहे हे सांगितले पाहिजे. तशापध्दतीने पुढच्या गोष्टी व्हाव्यात जी महाराष्ट्राची यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेली परंपरा, घडी आहे ती घडी विस्कटू न देता सत्ताधारी पक्षाचे लोक, मंत्रीमंडळातील लोक चुकत असतील तर त्यांना स्पष्ट सांगितले पाहिजे असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

या वाचाळवीरांना आवरा… त्यांना ताबडतोब सूचना द्या… महाराष्ट्राची जी परंपरा त्याला गालबोट लावू देऊ नका. महाराष्ट्राच्या परंपरेला जपलं पाहिजे ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंतु आज विधारक चित्र पाहायला मिळत आहे हे कुठेतरी थांबले पाहिजे असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड केलेली महाराष्ट्राला परवडणारा नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

ML/KA/PGB
15 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *