धारावीचा भूभाग बळकावायचा हा भाजपाचा डाव

 धारावीचा भूभाग बळकावायचा हा भाजपाचा डाव

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा कायापालट करण्यासाठी राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर धारावीचा पुनर्विकास करण्याचे स्वप्न मागील कित्येक वर्षांपासून धारावीकरांना दाखविले जात असून पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीचा भूभाग निकटवर्तीय यांच्या घशात घालण्याचे षडयंत्र भाजपा रचत असल्याची टिका आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केली.This is BJP’s ploy to seize the territory of Dharavi

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, २०३४ च्या डीसीपीआर ३३ (१०) (ए) नुसार धारावीचा व्यावसायिक आणि निवासी रिअल इस्टेटमध्ये प्रस्तावित विकास, यात केवळ झोपडपट्टीचाच समावेश नाही तर सरकारी जमिनीचाही समावेश आहे, जसे की बेस्ट डेपो तसेच अतिसंवेदनशील महाराष्ट्राची मिठी नदी आणि माहीम खाडीच्या संगमावर वसलेले निसर्ग उद्यान, वनस्पती असून हा भाग ५१२ एकर म्हणजे २ कोटी २५ लाख २८ हजार चौरस फूट आहे. यांचे बांधकाम क्षेत्र ९,०१,१२,००० चौरस फूट इतका धारावी परिसर व्यापलेला आहे. आताच्या घडीला धारावीत दहा लाख लोक राहतात. धारावीत मोठ्या संख्येने छोटे-मोठे व्यवसाय असून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या व्यक्ती धारावीत स्थिरावल्या आहेत. यांच धारावीची ओळख पुसळ्यासाठी हा प्रकल्प भाजपा आपल्या निकटवर्तीयांच्या घशात घालू इच्छीते आहे. त्यांच्या हा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे मत पत्रकार परिषदेत प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केलं.

ML/KA/PGB
15 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *