अमेरिकन व्हिसाच्या प्रतिक्षेतील भारतीयांसाठी दिलासादायक बातमी
मुंबई,दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेत गत वर्षी जो बायडेन यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर भारतीयांसाठी व्हिसा मिळण्याची प्रक्रिया काहीशी सुलभ होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याआधीच्या ट्रम्प शासन काळात व्हिसा मिळण्याच्या बाबतीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र आता अमेरिकन शासन भारतीयांना व्हिसा मिळण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल करत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे व्हिजा प्रतिक्षा कालावधी शक्य तेवढा कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे 1 लाख नवीन व्हिसा स्लॉट उघडण्यात आले असून H आणि L वर्क व्हिसाचे स्लॉटही खुले करण्यात आले आहेत. चालू वर्षी 82 हजार भारतीय विद्यार्थ्यांना स्टुडन्ट व्हिसा मंजूर करण्यात आले आहेत. येत्या वर्षभरात अमेरिकेतील कुटुंबियांना भेटण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी H1B व्हिसा धारकांना प्राधान्य दिले जाणार असल्याचेही अमेरिकन दूतावासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. Good news for Indians waiting for US visa
SL/KA/SL
11 Nov. 2022