संजय राऊत प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली

 संजय राऊत प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शिवसेना ( उबाठा ) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या जामिनाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने आज 25 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.Hearing postponed in Sanjay Raut case

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी आज न्यायालयाला सांगितले की, संजय राऊतच्या जामिनावर ट्रायल कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे मनी लाँड्रिंगशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईवर परिणाम होईल. न्यायालयाने संजय राउत यांच्या वकिलांना या प्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी नोटीस बजावली आहे.

विशेष म्हणजे बुधवारी विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला होता त्याला ई डी ने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

ML/KA/PGB
11 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *