भारत जोडो यात्रेत काँग्रेस पदाधिकाऱ्याचे निधन
नांदेड दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल रात्री महाराष्ट्रात दाखल झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी असलेल्या एका काँग्रेस नेत्याचा चालताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.
कृष्णकुमार पांडे असे त्याचे नाव असून काँग्रेस सेवादलाचे ते राष्ट्रीय सरचिणीस होते. देगलूर इथून आज सकाळी यात्रेला सुरुवात होताच अवघ्या चार किमी अंतर चालून गेल्यावर पांडे यांना हा झटका येऊन ते कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ते या यात्रेच्या ध्वज वाहक पथकाचे नेतृत्व करीत होते. Congress office bearer Krishnakumar Pande passed away during Bharat Jodo Yatra
पांडे यांच्या मृत्यू नंतर त्यांचे पार्थिव काँग्रेस यात्रा शिबिरात नेण्यात आले, तिथे त्यांना राहूल गांधी यांच्या सह अनेकांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या सन्मानार्थ आज पुढील यात्रा संपूर्ण शांततेत पार पाडण्यात आली.
ML/KA/SL
8 Nov 2022