नाट्य संमेलनातले वाद लवकर मिटावेत…
सांगली, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी नाट्य संमेलनातील वाद लवकर मिटावेत आणि शंभरावे नाट्य संमेलन भरवण्यात यावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक सतीश आळेकर यांनी व्यक्त केली आहे.The controversy at the theater conference will be resolved soon.
मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते आळेकर यांना सांगली येथे काल नाटककार विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करण्यात आले. नाटक हे प्रवाही असले पाहिजे अशी अपेक्षा सतीश आळेकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
आळेकर यांची नाटके वेगळेपणामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती असे मत जब्बार पटेल यांनी यावेळी व्यक्त केले. नाटकातून कोणते विचार मांडले जातात हे महत्त्वाचं असत असंही जब्बार पटेल यांनी यावेळी सांगितले.
ML/KA/PGB
6 Nov .2022