अंधेरीत २८.७७ टक्के मतदान

 अंधेरीत २८.७७ टक्के मतदान

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे. यात दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे. पाच वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाले आहे 28.77 percent polling in Andheri

अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान भाजपने ऋतुजा लटकेंविरोधात मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चर्चेत आली होती. मात्र राज ठाकरेंसह शरद पवारांनी विनंती केल्यानंतर भाजपने अंधेरीच्या मैदानातून माघार घेतली. या निवडणुकीत एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. आज दुपारी 3 वाजेपर्यंत 22.85 टक्के मतदान झाले आहे. या मतदानासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ML/KA/PGB
3 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *