सलग दुसऱ्या आठवडयात भारतीय बाजार (Stock Market) ४ टक्क्यांनी घसरला.

 सलग दुसऱ्या आठवडयात भारतीय बाजार (Stock Market) ४ टक्क्यांनी घसरला.

मुंबई, दि. 14 (जितेश सावंत ) : सलग दुसऱ्या आठवड्यात भारतीय बाजार आणखी ४ टक्क्यांनी घसरला आणि सलग पाचव्या आठवड्यात घसरणीचा सिलसिला चालूच ठेवला. याचे प्रमुख कारण म्हणजे वाढती महागाई. गुंतवणूकदार जगभरातील वाढत्या महागाईबद्दल चिंतेत होते व परिणामी त्यांनी विक्रीचा मार्ग स्वीकारला. जागतिक मध्यवर्ती बँकांद्वारे पुन्हा दरात वाढ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांच्या काळ्जीत भर पडली. रुपयाची ऐतिहासिक घसरण व विदेशी गुंतवणूकदारांची(Foreign institutional investors /FIIs) मोठ्या प्रमाणात विक्री याचा फटका देखील बाजाराला बसला. या सप्ताहात सेन्सेक्स २०४१. अंकांनी (३. ७२टक्के) घसरला व निफ्टीत ६२९.०५ अंकांची (३.८३टक्के) घसरण झाली.

भारतात एप्रिलमध्ये महागाई दराने विक्रमी स्तर गाठला. In India, inflation hit a record high in April. एप्रिलमध्ये किरकोळ महागाई (Retail Inflation)दर ७.७९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. हा आकडा मागील अठरा वर्षातील सर्वाधिक आहे.महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी रेपो दरात अचानक ०.४ टक्क्यांनी वाढ केली होती त्यानंतर बँकांनी कर्जांवरील व्याजदर वाढवले होते. आर.बी.आयची पुढील बैठक ही जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असुन त्यात पुन्हा एकदा रेपोदरात वाढ होण्याची शक्यता आहे. देशाच्या विकासदरालाही या महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. मॉर्गन स्टॅन्ले’ने देखील भारताच्या जीडीपीविषयीच्या अनुमानात ०.३० टक्क्यांनी घट केली आहे.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष,दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल, सोमवारी जाहीर होणारे चीनचे इंडस्ट्रियल आणि रिटेल सेल्स चे आकडे. मंगळवारी LIC IPO लिस्टिंग, भारतातील WPI data, बुधवारी जपानचा GDP data तसेच इंडस्ट्रियल प्रॉडकशनचे आकडे, यू.के, युरोपचा CPI data याकडे असेल.

मागील आठवड्यात नमूद केल्याप्रमाणे बाजार तांत्रिकदृष्ट्या कमजोर असल्याने मोठ्या प्रमाणात घसरण होऊन बाजाराने १५,७०० च्या आसपास तळ गाठला. बाजार ओव्हरसोल्ड असल्याकारणाने बाजारात थोड्या प्रमाणात उसळी येऊ शकेल. वरच्या स्तरावर निफ्टीसाठी १६,०००-१६२००-१६,३०० हे अत्यंत महत्वपूर्ण स्तर आहेत. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर उत्तम समभागात गुंतवणूक करावी.

अजून एका आठवड्याची सुरुवात नकारात्मक नोटवर. indices started yet another week on a negative note

अजून एका आठवड्याची सुरुवात नकारात्मक नोटवर झाली. मजबूत डॉलर, वाढत्या महागाईची चिंता,कमकुवत होणारा रुपया,चीनमधील लॉकडाऊन कडक होण्याची चिंता आणि जागतिक व्याजदर वाढीत अजून आक्रमकता येण्याच्या शक्यतेने बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. मजबूत यूएस नोकऱ्यांच्या डेटाने वेगवान दर वाढीची शक्यता बळावली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ३६४ अंकांनी घसरून ५४,४७०वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १०९ अंकांची घसरण होऊन १६,३०१ चा बंददिला.

अजून एका अस्थिर दिवशी बाजार खाली घसरला. Markets end lower on another volatile day

मंगळवारी अजून एका अस्थिर दिवशी बाजार खाली घसरून बंद झाला. एफएमसीजी आणि बँक वगळता सर्व क्षेत्रांमध्ये विक्री झाली.सेंट्रल बँकेने फॉरेक्स स्वॅप करूनही कमकुवत होणाराmanagement रुपया आयटी स्टॉक्स मध्ये तेजी आणण्यास अयशस्वी ठरला चांगले ऑर्डर बुक व मॅनॅजमेन्टचे निकालानंतरचे भाष्य सुद्धा कामी आले नाही. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १०५ अंकांनी घसरून ५४,३६४ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ६१ अंकांची घसरण होऊन १६,२४०चा बंददिला.

चौथ्या दिवशीही विक्री सुरूच राहिली.Sell-off continues for the fourth day

बुधवारी संमिश्र जागतिक संकेत असूनही, भारतीय निर्देशांक सकारात्मक नोटवर उघडले. परंतु काही वेळात नफवासुली झाल्याने नकारात्मकतेकडे झुकले. दिवस जसजसा वाढत गेला तशी विक्री वाढली व निफ्टीने १६,००० चा स्तर तोडला. दरम्यान, बँका, तेल व वायू आणि रियल्टी समभागात खरेदीमुळे शेवटच्या तासात बाजार जरा सावरला व रिकव्हर झाला. २५० हून अधिक समभागांनी आपला ५२ आठवड्याचा तळ गाठला ज्यात Wipro, Torrent Pharmaceuticals, Jindal Saw, Hindustan Zinc, Granules India, Aurobindo Pharma, Ashoka Buildcon, IDFC First Bank, and KEC International ह्या समभागांचा सुद्धा समावेश होता. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स २७६ अंकांनी घसरून ५४,०८८ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ७२ अंकांची घसरण होऊन १६,१६७ चा बंददिला.

महागाईच्या चिंतेमुळे सेन्सेक्स १,१५८ अंकांनी घसरला. Sensex tanks 1,158 points on inflation worries

जागतिक बाजारातील कमजोरीचा फटका सलग पाचव्या दिवशी भारतीय बाजाराला बसला.आशियाई बाजारातील कमकुवत व्यापारामुळे भारतीय इक्विटी बेंचमार्क लाल रंगात उघडले. वाढत्या महागाईच्या भीतीमुळे आणि सर्व क्षेत्रांमधील विक्रीमुळे बाजारात घसरण सुरूच राहिली.यूएस मधील महागाईच्या अहवालानंतर जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली.संध्याकाळी जाहीर होणाऱ्या देशांतर्गत किरकोळ महागाईच्या आकड्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात दुपारनंतर अधिक घसरण झाली.सेन्सेक्स१३०० अंकांनी घसरला.मेटल, पॉवर क्षेत्रातील विक्रीमुळे बाजार अधिक घसरला. सगळ्या क्षेत्राचे निर्देशांक लाल रंगात बंद झाले.(All sectoral indices ended in the red) दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १,१५८ अंकांनी घसरून ५२,९३० वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ३५९ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १५,८०८ चा बंददिला.

भारतीय निर्देशांक सलग सहाव्या दिवशी घसरले. Market extends losses for sixth day

शुक्रवारी भारतीय बेंचमार्क निर्देशांक सलग सहाव्या दिवशी घसरले. दुपारनंतर उर्जा, धातू ह्या समभागांमध्ये विक्री झाल्याने निर्देशांक खाली खेचले गेले. मजबूत आशियाई संकेतांमुळे बाजाराची दिवसाची सुरुवात सकारात्मक झाली. शेवटच्या तासात विक्री होईपर्यंत बाजार सकारात्मक होता. गुंतवणूकदारांना देशांतर्गत महागाईचा डेटा घाबरवण्यात अयशस्वी ठरला. मार्केट ओव्हरसोल्ड असल्याने सकाळी बाजारात तेजी दिसली. तथापि बँकिंग क्षेत्रातील कमकुवतपणामुळे उशीरा विक्री सुरू झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १३६ अंकांनी घसरून ५२,७९३ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २५ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १५,७८२ चा बंददिला.

(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com

 

ML/KA/PGB

14 May 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *