सर्वत्र धुक्याची दाट चादर; तूर, हरभरा, पिकांवर संकटाचे सावट, शेतकरी चिंतेत

 सर्वत्र धुक्याची दाट चादर; तूर, हरभरा, पिकांवर संकटाचे सावट, शेतकरी चिंतेत

वाशिम दि २२ : वाशिम जिल्ह्यात आज सकाळी सर्वत्र धुक्याची दाट चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. पहाटेपासूनच वातावरणात मोठ्या प्रमाणात धुके असल्याने जनजीवनावरही त्याचा परिणाम जाणवला. धुक्यामुळे रस्त्यांवरील दृश्यमानता कमी झाली होती. दरम्यान, सततच्या धुक्यामुळे तूर, हरभरा, संत्रा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामातील हरभरा पिकासह तूर, संत्रा आणि विविध भाजीपाला पिके शेतात उभी आहेत. सकाळच्या वेळी पडणारे दाट धुके आणि पानांवर साचणारा ओलावा यामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. विशेषतः हरभरा पिकावर मर रोग, बुरशीजन्य रोग तसेच तूर आणि भाजीपाला पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *