रेल्वे बुकिंगचा 40 वर्षे जुना नियम बदलणार

  रेल्वे बुकिंगचा 40 वर्षे जुना नियम बदलणार

मुंबई, दि. १४ : गेल्या चार दशकांपासून सुरु असलेल्या रेल्वे तिकिटाच्या नियमांमध्ये भारतीय रेल्वेने बदल केले आहे. यामध्ये प्रवाशांचा तिकिट बुकिंगचे नियम सर्वात महत्त्वाचे म्हणजे बदलणार आहे. आतापर्यंत आपण 40 वर्षे जुने म्हणजे 1986 सालापासून सुरु असलेल्या नियमानुसार तिकिट बुकिंग करत होतो. ही प्रणाली इटॅनियम सर्व्हर आणि ओपनव्हीएमएस तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे आता कालबाह्य झाले आहे. नवीन रेल्वे प्रणाली क्लाउड-आधारित असेल. यामुळे प्रवाशांना काय फायदा होणार आहे.

पीआरएस प्रणाली हे एक केंद्रीय संगणक नेटवर्क आहे जे सर्व रेल्वे काउंटर, आयआरसीटीसी वेबसाइट आणि ॲपला जोडते. देशातील 88% रेल्वे तिकिटे या प्रणालीद्वारे ऑनलाइन बुक केली जातात. यामधून वेटिंग लिस्ट, कोटा, तत्काळ तिकिटे आणि आसनांची उपलब्धता यांचेही व्यवस्थापन करते.

रेलवन ॲप हे नवीन पीआरएससाठी मोबाईल इंटरफेस आहे. यामुळे नवीन प्रणाली तुमच्या आवाक्यात येईल. हे एआय-सक्षम ॲप तुम्हाला हे देखील सांगेल की वेटलिस्टेड तिकीट कन्फर्म होईल की नाही. याची अचूकता53% वरून 94% पर्यंत वाढली आहे. सध्या, या ॲपद्वारे दररोज 9.29 लाख तिकिटे बुक केली जात आहेत. भारतीय रेल्वेची ही सेवा ऑगस्ट महिन्यापासून सुरु होणार आहे.

भारतीय रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांनाच मोठा फायदा होणार आहे. जुन्या नियमानुसार एका मिनिटांत 32000 तिकिटे बुक होतात. तसेच नव्या नियमानुसार एका मिनिटांत 150000 तिकिटे बुक करण्याची क्षमता आहे. यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकिटं मिळण्याची शक्यता वाढणार आहे. नव्या प्रणालीमुळे ही शक्यता पाच पटीने वाढेल. ट्रेनची उपलब्धता तपासण्याची क्षमता देखील प्रति मिनिट 4लाखा वरून ४लाखांपर्यंत वाढेल. याचा अर्थ असा की, दिवाळी, होळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसारख्या सर्वाधिक मागणीच्या काळात, सर्व्हर डाउनटाइम आणि बुकिंग अयशस्वी होण्याच्या समस्या दूर होतील. त्यामुळे प्रवाशांचे तिकिट कन्फर्म मिळणार याची शक्यता 100 टक्के वाढते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *