छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून अभिवादन
मुंबई, दि १४: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
आज विधानभवन येथे नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत मंत्री शंभूराज देसाई मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी दाखल झाले होते. यावेळी काही आमदार आणि मंत्रालयातील अधिकारी-कर्मचारी यांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.KK/ML/MS