चंद्रपूरचे सुपुत्र डॉ. विनोद बहाडे कोलंबियात भारताचे नवे राजदूत

 चंद्रपूरचे सुपुत्र डॉ. विनोद बहाडे कोलंबियात भारताचे नवे राजदूत

चंद्रपूर दि १४ :— चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावचे सुपुत्र डॉ. विनोद बहाडे यांची दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केली असून, त्यांच्या यशाने संपूर्ण चंद्रपूर आणि विदर्भ गौरवान्वित झाला आहे. डॉ. विनोद बहाडे हे यापूर्वी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इजिप्त आणि व्हिएतनाम येथील भारतीय दूतावासांमध्ये विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडले आहेत. चंद्रपूर येथे या नियुक्तीची बातमी कळताच सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *