कचरा व्यवस्थापनात मुंबई विमानतळाला Platinum Rating

 कचरा व्यवस्थापनात मुंबई विमानतळाला Platinum Rating

मुंबई, दि.13 : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (सीएसएमआयए) कचरा व्यवस्थापनात मोठी कामगिरी करत ‘कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री’कडून (सीआयआय) मानाचे ‘झिरो वेस्ट टू लँडफिल (ZWL) प्लॅटिनम- क्लास १’ रेटिंग मिळवले आहे. विमानतळावर जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी ९९ टक्क्यांहून अधिक कचऱ्याचे पुनर्वापरासाठी रूपांतर करण्यात यश आले असून, त्यामुळे लँडफिलवरील अवलंबित्व जवळजवळ संपुष्टात आले आहे. वार्षिक ५ कोटींहून अधिक प्रवासी हाताळणाऱ्या आणि हे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या मोजक्या भारतीय विमानतळांमध्ये मुंबई विमानतळाचा समावेश झाला आहे.

‘मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड’द्वारे (एमआयएएल) संचलित हा उपक्रम ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड’ (AAHL) आणि ‘भारतीय विमानतळ प्राधिकरण’ (AAI) यांचा संयुक्त प्रकल्प आहे. सीआयआयच्या २०२५-२६ च्या मूल्यांकनानुसार, विमानतळावर ओला-सुका कचरा, प्लास्टिक आणि इतर पुनर्वापरयोग्य वस्तूंचे वर्गीकरण व पुनर्प्राप्तीसाठी सर्वोत्तम यंत्रणा राबवली जात आहे.

विमानतळावर प्रामुख्याने अन्न, प्लास्टिक, कागद आणि ऑपरेशनल कचरा जमा होतो. ‘५आर’ तत्त्वावर आधारित कार्यपद्धतीमुळे (Reduce, Reuse, Recycle, Recover, Refuse) कचरा कमी करणे, पुनर्वापर करणे आणि पुनर्प्राप्ती करणे शक्य झाले आहे. याशिवाय, विमानतळाने गेल्या वर्षभरात १०० टक्के अक्षय ऊर्जेचा वापर, ऊर्जा कार्यक्षमतेत ४० टक्क्यांहून अधिक सुधारणा आणि जमिनीवरील ताफ्याचे विद्युतीकरण यांसारखे उपक्रम राबवले आहेत.

या शाश्वत विकासाच्या पावलांमुळे जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात मुंबई विमानतळाचे स्थान अधिक बळकट झाले आहे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या बाबतीत तो एक आदर्श ठरत आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *