बाळासाहेब ठाकरेंवर लवकरच टपाल तिकीट

 बाळासाहेब ठाकरेंवर लवकरच टपाल तिकीट

मुंबई, दि.9 : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करून भारतीय टपाल विभागाकडून अनोखी आदरांजली दिली जाणार आहे. या संदर्भात शिवसेना सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या मागणीची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली असून लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. या मागणीबाबत केंद्र सरकारकडून नुकतेच एक पत्र प्राप्त झाल्याची माहिती शेवाळे यांच्याकडून देण्यात आली.भारतीय टपाल विभागातील उपमहासंचालक कार्यालयाकडून शेवाळे यांना प्राप्त झालेल्या पत्रात लिहिले आहे की, फिलाटेल (संग्रह) विभागाच्या सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. त्यामुळे लवकरच अशा प्रकारचे तिकीट जारी केले जाण्याची शक्यता आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *