मिसिंग लिंकवर 3 दिवसांत 45 हजारांहून अधिक दंड वसुली

 मिसिंग लिंकवर 3 दिवसांत 45 हजारांहून अधिक दंड वसुली

मुंबई, दि. 6 : मुंबई-पुणे यांतील अंतर कमी करणाऱ्या मिसिंग लिंक अर्था कनेक्टींग लिंकचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. आर्थिक आणि सांस्कृतिक राजधान्या जोडणाऱ्या या महत्त्वाच्या महामार्गावर सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून वाहतूक नियमही कडक करण्यात आले आहेत. गेल्या ३ दिवसांत वाहन चालकांनी विविध प्रकारे नियमभंग केल्याने 45 हजारांहून अधिक दंड वसूल झाला आहे.

या नवीन मार्गावर वेगाच्या मर्यादा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात महामार्ग पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. शिवाय मिसींग लिंकवर मध्येच गाड्या थांबवून फोटोग्राफी करणाऱ्यां विरोधात ही कारवाई केली जात आहे. गेल्या तीन दिवसांत मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करण्यात आला आहे. त्याची माहिती वाहतूक पोलीसांनी दिली आहे.

बेशिस्त चालकांना वाहतूक पोलीसांनी चांगलाच दणका दिला आहे. गेल्या तीन दिवसांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास 95 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये प्रामुख्याने अतिवेग, लेनची शिस्त न पाळणे आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे, मिसिंग लिंक वर फोटो सेशन करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.SL/ML/SL

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *