चुकीच्या पद्धतीने महापालिकेचा भूखंड देणाऱ्या सत्ताधार्‍यांना विरोध करणारच

 चुकीच्या पद्धतीने महापालिकेचा भूखंड देणाऱ्या सत्ताधार्‍यांना विरोध करणारच

मुंबई प्रतिनिधी, दि. ३० : चुकीच्या पद्धतीने महापालिकेचा भूखंड सत्ताधाऱ्यांच्या घशात घालण्याच्या प्रस्तावाला आम्ही कडाडून विरोध करणारच अशी माहिती महापालिका काँग्रेस गटनेते अशरफ आजमी यांनी दिली.
महापालिका सभागृहातील तातडीचे कामकाजाबाबत वडाळा येथील महापालिकेचा भूखंड गोदरेज कंपनीला चुकीच्या पद्धतीने डेव्हलपमेंट करण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रस्तावाला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला. तसेच या प्रस्तावाबाबत घेण्यात आलेल्या वोटिंग मध्ये विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी एकूण वोटिंगच्या एक तृतीयांश विरोधी वोटिंग करून या प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे हा प्रस्ताव आता नाकारला गेला. त्यामुळे मुंबईकरांचा आणि विरोधी पक्षाचा हा पहिला विजय झाला असून यापुढे देखील विरोधी पक्ष हा मुंबईकरांच्या हितासाठीच भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. तसेच सत्ताधाऱ्याचे मनमानीने मुंबईकरांच्या विरोधात कोणताही प्रस्ताव आला तर तो आम्ही पास होऊ देणार नाही. अशी माहिती महापालिका नगरसेवक, काँग्रेस गटनेते अशरफ आजमी यांनी दिली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *