मस्साजोगमध्ये ‘भावनिक’ लाटेपेक्षा ‘विकासाला’ कौल
बीड दि २९ …संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मस्साजोग ग्रामपंचायत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत स्वरूपानंद देशमुख यांनी धक्कादायक विजय मिळवला असून, त्यांनी मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव केला आहे.
तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देशमुख कुटुंबाकडून मोठे प्रयत्न झाले, मात्र गावकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ही निवडणूक पूर्णपणे भावनिक मुद्द्यावर नेली होती. मात्र, मतदारांनी भावनिक आवाहनाला साद न देता स्वरूपानंद देशमुख यांच्या विकासकामांच्या आश्वासनावर विश्वास दाखवला.ML/ML/MS