काळ्या हळदीला सोन्याचा भाव! तब्बल २१,१५० उच्चांकी दर
वाशीम दि १९ : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळ्या हळदीला म्हणजेच ‘कोच्या’ हळदीला यंदा विक्रमी दर मिळत असून तब्बल २१ हजार १५० रुपये प्रति क्विंटल असा उच्चांक नोंदवला गेला आहे. लागवडी दरम्यान बियाणे म्हणून वापरलेली हळद जमिनीत कालांतराने सडून वाळते, तिलाच ‘कोच्या’ किंवा काळी हळद म्हटले जाते.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली ही काळी हळद संधिवात, यकृताचे विकार, तसेच त्वचारोगांवर उपयुक्त मानली जाते. त्यामुळे बाजारात तिची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या शेतात मशागतीची कामे सुरू असताना जमिनीतून कोच्या हळद बाहेर येत असून, या हळदीला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे इतर हळदीच्या तुलनेत काळ्या हळदीला सर्वाधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.ML/ML/MS