पॉन्झी योजनेत फसलेल्या गुंतवणूकदारांना नवीन कायद्याचा लाभ
मुंबई दि २४ : ज्यादा पैसे देण्याचं आमिष दाखवून पैसे लुबाडणाऱ्या कंपन्यांची जप्त केलेल्या मालमत्तांबाबत त्या लिलावासाठी खुल्या करण्यासाठी सहा महिन्यात न्यायालयांनी निर्णय घ्यावा यासाठी नवीन कायदा तयार करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
याबाबतचा मूळ प्रश्न हेमंत ओगले यांनी उपस्थित केला होता त्यावर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी माहिती दिली त्यात हस्तक्षेप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. अशा जप्त केलेल्या मालमत्तांबाबत सहा ते सात वर्षे निकाल लागत नाही त्यामुळे फसलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करण्यात दिरंगाई होत असल्याचं निष्पन्न होत आहे, त्यामुळे याबाबत स्वतंत्र कायदाच करण्यात येईल, याचा फायदा सर्व सामान्य नागरिकांना होणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.ML/ML/MS