धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन सुरू
मुंबई, दि १७
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आजपासून बेमुदत उपोषण सुरू झाले आहे. आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून हजारो समाजबांधव आंदोलनात सामील झाले असून, सरकारने दिलेली वेळ संपल्याने आता आरक्षणाचा थेट निर्णय झाल्याशिवाय मागे न हटण्याचा आक्रमक पवित्रा येथील आंदोलकांनी घेतला आहे.
धनगर समाजाला एसटी (अनुसूचित जमाती) प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करणे यासाठी
गेल्या १२ वर्षांपासून वाट पाहिल्याचे सांगत, आता घटनादुरुस्तीचा अधिकार मिळाल्याशिवाय किंवा ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.
या आंदोलनाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढत असून महाराष्ट्रभरातून हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले असून, आंदोलनाचा जोर वाढत आहे.
हे आंदोलन राज्य सरकारवर दबाव वाढवण्यासाठी असून, आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाने एकजूट दाखवली आहे ती योग्यच आहे. मुख्यमंत्री महोदयांसमोर किती वेळा बैठकी झाल्या त्यांनी सांगितले की सकारात्मक मार्ग काढू परंतु आज बैठकीला होऊन चार महिने झाले तरी काय मार्ग निघत नाही. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन असेच सुरू राहील अशी माहिती आंदोलन करते दीपक बोराडे यांनी दिली.KK/ML/MS