परळ येथील खाजगी ग्लोबल हॉस्पिटल मध्ये 150 कोटींचा घोटाळा, रुग्णालयावर कारवाई कधी करणार? आमदार अजय चौधरी यांची मागणी.
मुंबई, दि १७
परळ येथील ग्लोबल रुग्णालयामध्ये होत असलेल्या दीडशे कोटीच्या भ्रष्टाचाराबाबत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि शासन काहीच कारवाई करत नाही याबाबत स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन केले. यामध्ये त्यांनी मागील तीन ते चार वर्षापासून या रुग्णालयाच्या भ्रष्टाचाराबाबत शासन कोणतेही उपायोजना आणि कारवाई करत नसल्याच्या भूमिकेबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करून आज त्यांनी आंदोलन सुरू केले. ग्लोबल रुग्णालयामध्ये महापालिकेच्या अनेक सवलती रुग्णालयाने घेतल्या असून एफएसआय देखील मोठ्या प्रमाणात महापालिकेकडून या रुग्णालयाने घेतला आहे. या सवलतीच्या बाबत महापालिका प्रशासनाने त्यांना 15% सवलत देण्याप्रमाणे 36 बेड हे गरीब आणि अत्यंत गरीब असलेल्या रुग्णांना आरोग्य सेवा देण्याच्या हेतूने ठेवले पाहिजे असा कायदा आहे परंतु या कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे . हे रुग्णालय गोरगरीब रुग्णांना सेवा देत नसून एका बेडचे एका दिवसाचा दर हा 5000 रुपये असून ईसीजी आणि ब्लड प्रेशर तपासण्यासाठी हे रुग्णालय कमीत कमी दहा हजार रुपये एवढी शुल्क आकारत आहे.अत्यंत अन्यायकारक रुग्णसेवेचा दर असून यामुळे सामान्य गरिबांनी अत्यंत गरीब रुग्ण या ठिकाणी आरोग्य सेवेपासून वंचित ठेवले जात आहेत. एका दिवसाचे पाच हजार याप्रमाणे आपण मागील 15 वर्षाचा जर हिशोब लावला तर एकूण 150 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या रुग्णालयामध्ये झाला आहे. महापालिकेने या ग्लोबल रुग्णालयासोबत एम ओ यू करणे अभिप्रेत होते परंतु आज पर्यंत या रुग्णालयासोबत एम ओ यू केलेले नसून यामध्ये कोणीतरी राजकीय हस्तक्षेप होत आहे त्यामुळे या रुग्णालयातील घारीचा शुक्राचार्य कोण आहे. हे शोधण्याची वेळ आली असून येता पंधरा दिवसात जर या रुग्णालयावर कारवाई झाली नाही तर मी या रुग्णालयाच्या बाहेर बसून आंदोलन करीन आणि स्थानिक नागरिकांना आणि रुग्णांना या आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील करू अशी माहिती आमदार अजय चौधरी यांनी दिली. KK/ML/MS