अंमली पदार्थ विरोधी मोहिमेसाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या या घोषणा
मुंबई दि १७ : अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीत परदेशी नागरिकांचा सहभाग वाढला असून त्यांचे पासपोर्ट आणि व्हिसा यांची मुदत तपासणे, त्याची माहिती ठेवणं यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार आहे आणि वारंवार वेळमर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या बार, पब यांचे परवाने थेट रद्द करण्यात येतील अशी घोषणा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या एका प्रश्नाच्या उत्तरात केली.
हा प्रश्न स्नेहा दुबे यांनी उपस्थित केला होता त्यावर नाना पटोले, विलास तरे यांनी उपप्रश्न विचारले होते. राज्यात अंमली पदार्थ विक्री विरोधात सर्वत्र टास्क फोर्स ची स्थापना करण्यात आली आहे, यात अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो यासाठी गुन्ह्याचे वयमर्यादा अठरा वरून सोळा करण्याची विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
याबाबतचा मूळ प्रश्न प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता त्यावर विक्रम पाचपुते, नितीन राऊत, विकास ठाकरे आदींनी उपप्रश्न विचारले. अमली पदार्थांची खरेदी विक्री चे धागेदोरे परराज्य आणि परदेशात ही सापडत आहेत त्यासाठी त्या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन तिकडून गुन्हेगार शोधून आणले जात आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले.
शहरी आणि ग्रामीण भागातही अशा प्रकारांसाठी आवश्यक यंत्रणा तयार करण्यात आल्या आहेत, पोलिसांनी दिरंगाई केली, दुर्लक्ष केलं अथवा सहभाग आढळला तर त्यांना थेट बडतर्फ करण्यात येत आहे असं ते म्हणाले.ML/ML/MS