सामूहिक कॉपी प्रकरणात शिक्षण मंडळाकडून 103 शिक्षकांवर कारवाई

 सामूहिक कॉपी प्रकरणात शिक्षण मंडळाकडून 103 शिक्षकांवर कारवाई

मुंबई, दि. १६ : लाखो विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या. या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी मंडळाने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणले होते. या तंत्रज्ञानाचा वापर कमालीचा यशस्वी ठरला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या सखोल तपासणीतून सामूहिक कॉपीचे धक्कादायक प्रकार उजेडात आले आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तब्बल 103 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या दोन्ही परीक्षामध्ये होणाऱ्या गैरप्रकाराविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक ठिकाणी सामूहिक कॉपीचे प्रकार झाले आहेत.
मंडळाने या परीक्षेत नक्षलग्रस्त भागातील परीक्षा केंद्रांवरही करडी नजर ठेवली होती. गडचिरोली जिल्ह्यातील ब्रोमनवार विद्यालयात राज्यशास्त्राच्या पेपरला मायक्रोनोट्स व कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून तयार केलेले मुद्रित साहित्य सामूहिक कॉपीसाठी वापरण्यात आले होते. या प्रकरणी येथील 3 शिक्षक व एका शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ल्ह्यातील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात 16 फेब्रुवारीला बारावी भौतिकशास्त्राचा पेपर होता. त्यात तब्बल 581 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याची धक्कादायक बाब निष्पन्न झाली. याशिवाय शेंदूर्जाना आढाव येथील 3 कर्मचारी निलंबित करण्यात आलेत. तसेच रुईगोस्ता येथील 5, मांडवा येथील 7, रिसोड येथील 3 व लेहणी येथील केंद्रांवरील 2 कर्मचाऱ्यांवर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर कारवाई करण्यात आली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *